हिमाचलचे नंदनवन : मनाली
आपल्या प्राकुतिक सौंदर्याने मनालीला "डोंगराची राणी" असे बिरुद मिळाले आहे. मनालीच्या चहूबाजूला हिरवी गार वने तसेच हिमाच्छादित पर्वत शिखरे आहेत. निसर्गाने मुक्तहस्ते इथे पखरण केली आहे.प्रत्येक बदलत्या महिन्याला मनालिचे सौंदर्य बदलत जाते तितकेच ते अधिकाधिक विलोभनीय आणि रमणीय होते. मनाली बारमाही आकर्षक ठिकाण आहे. ग्रीष्मामध्ये सर्व पर्वतराजी विविधरंगी फूलानी नटलेली पहावयास मिळते; तर शरदामध्ये सर्व सृष्टि पांढरीशुभ्र दुलई पांघरल्याप्रमाणे आभासमान होते; त्याचबरोबर मनालीच्या डावीकडून अवखळ आणि अव्याहत वाहणारी 'बियास' नदी शहराच्या सौंदर्यात भरच घालते.सोबत एकमेकांसोबत ऊँचीचे स्पर्धा करू पाहणारे देवदारचे वृक्ष अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडतात. येथून हिम रेखा अत्यंत जवळ आहे. अगदी थोड्क्या प्रवासात प्राकुतिक हिम आपण पाहू शकतो.
मनाली=मनु+आलय; याचा अर्थ "मनुचे निवासस्थान" असा होतो. वास्तविक मनाली गाव मुख्य शहरापासून १.५ किमी अंतरावर 'मनालसू' नाल्याच्या पैलतीरावर आहे. मनाली शहर इ.स. १८७५ च्या नंतर वसवले गेले. १९५८ मध्ये भारताचे प्रथम पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु येथे आले होते. त्यांच्या येथील आगमनानेच मनालीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गणले जाऊ लागले. त्यावेळी पंतप्रधान यानी लोक निर्माण विभागाच्या विश्राम गृहात निवास केला होता.सध्या मनालीत जवळपास ४०० होटेल/ अतिथिग्रुहे आहेत; तसेच अंदाजे ५५० taxi आहेत. बर्फाच्छादित शरद ऋतू असो वा रिमझिम करता वर्षा ऋतू अथवा अगदी आल्हाददायक वसंत असो. मनाली सदैवचे पर्यटक लोकांसाठी नंदनवन ठरले आहे.
ढुंगरी मंदिर
मनाली शहराच्या अगदी पशिमेस उंच देवदार वृक्षांच्या मधोमध हे ढुंगरी मंदिर थोड्या उंचीवर स्थित आहे.मंदिरापर्यन्त पोहोचण्यासाठी पक्का रस्ता आहे; जो साधारण १ किमी लाम्बिचा आहे. चार छत असलेले मेरुशैली मधील हे मंदिर ८० फूट उंच आहे. मंदिराच्या तिन्ही बाजूस ओसरी आहे. आणि बरेच खाम्ब आहेत. प्रत्येक खाम्बवर अत्यंत नाजुक असे कोरीव काम आहे. ब्रम्हा, विष्णु, महेश,शंकर, गणेश इ. देवतांचे लाकडी कोरीव काम आहे. मंदिराच्या गाभार्यात ६० सेमी ची देवी ची दगडी प्रतिमा स्थापित आहे. प्रवेशद्वाराच्या डावीकडील बाजूस दुर्गा देवीच्या चरण पादुका आहेत. हे मंदिर इ.स.१५५३ मध्ये राजा बहादुर सिंग याने बांधले.
हिडिम्बा नावाची राक्षसी होती जी आपल्या अघोरी तपस्येने दैवत्वास पोहोचली होती. आपल्या वनवासात पांडव ज्यावेळी येथे आले होते; तेव्हा तिने भीमास वरले होते असे मानले जाते. येथील स्थानिक लोक हिडिम्बा मातेची दुर्गा मातेचा अवतार समजून पूजा करतात. मंदिरामध्ये एक प्रचंड शिला आहे. हिडिम्बा मातेने याच शिलेवर बसून उग्र तप केले होते असे मानले जाते. याच साठी या मंदिरास ढुंगरी मंदिर असे संबोधले जाते; कारण 'शिला' ला स्थानिक लोक 'ढुंगर' असे संबोधतात.
ढुंगरी वन विहार
ढुंगरी मंदिर परिसरातच देवदार वृक्षांच्या मध्येच वन विहारस उत्तम असे शांत व अत्यंत रम्य असे स्थल आहे. रोजच्या धकाधकीच्या आणि गर्दीच्या जीवनापासून दूर आणि प्रकृतीच्या नाजुक कुशीत सहल ही एक खासच मजा आहे. प्रत्येकाने अवश्य पहावे इतके हे ठिकाण प्रेक्षणीय आहे. हे वन विहार ३ चौ.किमी पसरलेले आहे. सहलीसाठी विशेष सुविधा येथे पुरविल्या जातात. येथे येण्या साठी अगोदर प्रवेश शुल्क आकारले जाते.
मनाली वन विहार
मनाली शहराला लागुनच हे एक सुरक्षित असे वन आहे. हे एक देशातील असे वन आहे जेथे अनेकविध वृक्षांची लागवड केली आहे. हे केवळ एक वन विहान नसून एक उत्तम व शांत असे शिबिरस्थल आहे. येथे एक छोटेसे प्राणी संग्रहालय आहे तसेच मुलांसाठी खास विभाग आहे. ४ चौ.किमी परिघात हे विस्तारले आहे. येथे येण्यासाठी प्रवेश शुल्क द्यावे लागते.
मनु मंदिर
हे मंदिर मनाली शहरापासून १.५ किमी दूर आहे. मनूला सृष्टिचा निर्माता मानले जाते.याच मनूची मूर्ती "धौनी-चौनी" वंशातील 'गौरी' नावाच्या व्यक्तीच्या अंगणात पुरलेली सापडली होती. मूळ मंदिर याच स्थानावर बांधण्यत आले आहे.मंदिरा पर्यन्त जाण्यासाठी कमालीचा अरुंद रस्ता आहे. हलकी वाहने येथून जाऊ शकतात.याच ठिकाणी "फागली मेला" सर्व प्रथम सुरु होतो; जो फाल्गुन महिन्यात दरसाल साजरा केला जातो. मनू ने "मनूस्मृति" येथेच लिहिली असेही मानले जाते.मनूस्मृतिस आदर्श शासन आणि सामाजिक आचरण यासंबंधीचे सर्वात जुने पुस्तक मानले जाते.
वसिष्ठ मंदिर (गरम जल स्त्रोत )
वसिष्ठ गाव मनाली पासून ६ किमी दूर आहे. हलक्या वाहनाने तेथ पर्यन्त सहज पोहोचता येते. हे गाव काहीसे उंचीवर वसले आहे. येथे वसिष्ठ मुनींचे ४००० वर्ष जुने मंदिर आहे. हे मंदिर राजा जन्मेजय याने आपले पिता परीक्षित यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधले होते. खस शैली मध्ये बांधलेले हे मंदिर सुन्दर आहे .वसिष्ठ मुनिंची प्रतिमा दगडात कोरली आहे आणि तिला धोत्राने लपेटले आहे. असे मानले जाते की येथे वसिष्ठ ऋषिनी तप केले होते व येथेच त्यांचा आश्रम होता.
वसिष्ठ गाव हे येथील उष्ण जल स्त्रोतांसाठी ही प्रसिद्ध आहे. येथे गरम पाणी दगडाच्या खालून अखंड येत असते. कल्शियम, गंधक यांच्या खड़कातील आधिक्याने पाणी गरम होते असे शास्त्रीय कारण सांगितले जाते.गंधकाचा गंध हा पाण्याच्या वाफेलाच येतो. १२३*से. इतके पाण्याचे तापमान असते. एका दंतकथेनुसार लक्ष्मण ज्यावेळी गुरु वसिष्ठ यांच्या आश्रमात पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की वासिष्ठाना स्नानास फार दूर जावे लागते; हे लक्षात येताच त्याने धरणीवर एवढ्या जोरात बाणाचा वार केला की तेथून एक जलप्रवाह सुरु झाला.
येथून ५००मी अंतरावरच पर्यटन विभागाने "टर्किश बाथ" बनवले आहेत. ज्यामध्ये वसिष्ठ कुंडातून पाणी नेले जाते. येथे सशुल्क स्नान करण्यास मुभा आहे.हे असे गरम पाणी गाठी, वात, आणि त्वचा रोगांवर गुणकारी आहे. याशिवाय थकवाही घालवता येतो.

No comments:
Post a Comment